Author Topic: |!| ती रात्र कधीच सरली... |!|  (Read 1005 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
|!| ती रात्र कधीच सरली... |!|
« on: April 06, 2014, 06:46:44 AM »
ती रात्र कधीच सरली...

आज हवेतला गारवा ही,
खूप वेगळाच भासत होता...
अन् झाकताच नयन माझे,
तुझा चेहरा आठवत होता...

पहाट होताच उमलणारी ती,
सुगंध पसरवणारी नाजूक कळी...
अन् मला पाहून हसताना,
शोभत तुझ्या गालावरती खळी...

पक्षी-पाखरे साद घालत,
उंच भरारी आकाशी घेती...
अन् आठवणीत त्‍या तुझ्या,
मन हे माझे वेडी झुलती..

माझ्या जीवनी परत आलीस,
भेटताच आनंदाचे अश्रू वाहली...
अन् माझ्या पापण्‍याची खाली,
अलगद जरा जागा ओली झाली...

सुर्याचे ते कोवळे किरणे,
डोळ्यावरती माझ्या पडली...
उडून बघतो तर काय हे,
ते रात्र कधीच निघून सरली...


--------------------------
- स्‍वप्‍नील चटगे
« Last Edit: April 10, 2014, 11:20:19 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता