Author Topic: |!| 'तुझ्यासाठी कविता'.... |!|  (Read 2721 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
|!| 'तुझ्यासाठी कविता'.... |!|
« on: April 14, 2014, 11:15:35 AM »
---तुझ्यासाठी कविता---

मनात होत खुप तुझ्याबद्दल पण ,
नाही आणता आलं कधी ओठावर...
अन् अबोल राहिलो प्रत्येक क्षण,
आणत स्मित हास्य मी गालावर...

माझ्या मनात तुझ्या भावना,
तसेच खोलवर जाऊन दाटल्या...
अन् चादंण्या रातीत जागुन,
केवळ तुझेच स्वप्न पाहिल्या....

सागरी किनार् याच्या  काठावर,
एकटेपणात माझ्या मला हरवत...
अन् कातरवेळ होताच सायंकाळ,
तुझ्या विरहात मी पुन्हा मिरवत....

आता ती वेळ निघुन गेली,
तुला सारं सागुनं टाकायचं...
राहिल्या केवळ तुझ्या आठवणी,
आता त्याच आठवणीत जगायचं...

आता केवळ वेड लागलयं,
तुझ्यासाठी कविता करायची...
अन् मनातल्या भावनाना पून्हा,
नव्याने कोर् या कागदावर उतरावयची...!!

---------------- ---------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता