Author Topic: मला एवढेच हवे आहे! (Valentine Special)  (Read 2171 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
वीस वर्षा पूर्वीचा
स्कूटर वरून फिरताना
रस्त्यात मारलेल्या तुझ्या बिनधास्त मिठीतला
थरार मागत नाही
But  O My Valentine!
कधी स्कूटर वरून फिरताना
रस्त्यात मला जरा खेटून बसलीस तरी
रोमांचित होईन .........................
मला एवढेच हवे आहे!

वीस वर्षा पूर्वीचा
ऑफिसला निघताना
तुला बिनधास्त जवळ घेण्यातला
थरार मागत नाही
But  O My Valentine!
कधी ऑफिसला निघताना
हात पकडल्यावर उघड्या खिडकीकडे बघितलं नाहीस
तर रोमांचित होईन.........................
मला एवढेच हवे आहे!

वीस वर्षा पूर्वीचा
भरल्या घरात
नकळत तुझ्या गालावर कीस करण्यातला
थरार मागत नाही
But  O My Valentine!
कधी भरल्या घरात
नजर चुकवून पडद्या आड कीस घेऊ दिलास
तर रोमांचित होईन.........................
मला एवढेच हवे आहे!

वीस वर्षा पूर्वीचा
बागेत फिरताना
बिनधास्त तुला जवळ घेऊन चालण्यातला
थरार मागत नाही
But  O My Valentine!
कधी बागेत फिरताना
सहज माझा हात हातात घेतलास
तर रोमांचित होईन.........................
मला एवढेच हवे आहे!

वीस वर्षा पूर्वीचा
थरार मागत नाही
......................... But  O My Valentine!
.........................मला एवढेच हवे आहे!


आता "आहो" झालेला वीस वर्षा पूर्वीचा तुझा केदार.... :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: मला एवढेच हवे आहे! (Valentine Special)
« Reply #1 on: February 14, 2013, 12:19:08 PM »
jabardast sir
mast
Kup aawadli kavita :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: मला एवढेच हवे आहे! (Valentine Special)
« Reply #2 on: February 14, 2013, 04:37:16 PM »
HAPPY VALENTINES DAY!

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: मला एवढेच हवे आहे! (Valentine Special)
« Reply #3 on: February 14, 2013, 05:57:48 PM »
superb........kedar .........jabardast thrar anubhavla aaj premacha ati sunder

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मला एवढेच हवे आहे! (Valentine Special)
« Reply #4 on: February 15, 2013, 10:46:40 AM »
Dhanyvaad..... tumcha saglyaancha valentine day chan jhaalaa asel hi apeksha....