Author Topic: सख्या रे, आज व्हॅलेंटाइन्स डे!  (Read 1199 times)

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
सख्या रे, आज व्हॅलेंटाइन्स डे!
तुझ्या दृष्टीने तसा रोजचाच सर्वसामान्य दिवस...
पण माझ्यासाठी, वेळ काढून साजरा केलेला एक सोनेरी क्षण.
मला हा संपूर्ण दिवस तुझ्या सोबत घालवायचाय...
समुद्र किनारी बसून तुझ्या हातात हात द्यायचाय.
वाळूत आपले एक छोटेसे सुंदर घरटे बनवून ...
शंख शिंपल्यांनी आपला तो महाल सजवायचाय.
मग बर्फाचा गोळा एकमेकांकडे पाहत खाऊ ...
शहाळ्यातले पाणी हि एकाच स्ट्रा ने पिऊ.
चल ना रे सख्या,
रोजच्यापेक्षा आज काही तरी वेगळे करू ...
एकमेकांच्या सहवासात मावळता सूर्य पाहु.
चांदण्या रात्रीत मग चंद्राकडे एकटक पाहत राहू.
साक्षी ठेवून त्याला कुशीत एकमेकांच्या विसावू ...
सख्या रे! आज तरी  तुझा व्यवहारीपणा सोड ना ...
थोडासा रोमांटिक होऊन माझ्यासारखाच विचार कर ना.

- संतोषी साळस्कर.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Santoshi ji khup masta ekadam..

मला हा संपूर्ण दिवस तुझ्या सोबत घालवायचाय...
समुद्र किनारी बसून तुझ्या हातात हात द्यायचाय.
वाळूत आपले एक छोटेसे सुंदर घरटे बनवून ...
शंख शिंपल्यांनी आपला तो महाल सजवायचाय.
मग बर्फाचा गोळा एकमेकांकडे पाहत खाऊ ...
शहाळ्यातले पाणी हि एकाच स्ट्रा ने पिऊ.

Chan oli ahet.. Purviche divas athavale.