Author Topic: प्रिये सांग ना!  (Read 1986 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
प्रिये सांग ना!
« on: March 19, 2013, 12:20:22 PM »
प्रिये सांग ना!

जन्मास आली एक निर्भया!
तिने रचला इतिहास नवा!
शेवटच्या क्षणापर्यंत
केला तिने प्रतिकार अत्याचाराचा!
सरकार म्हणे करणार एक कायदा नवा!
तिच्या आत्मरक्षणाचा!

कलम १ म्हणे;
१४ सेकंदे त्याने तिला बघितले;
तर तो अजामीनपात्र गुह्ना;
अन तीन वर्ष सजा!
प्रिये सांग ना;
तुला तासनतास न्ह्याहाळनारा मी;
आता टप्प्याटप्प्यांमधे
तेही फक्त १३ सेकंदाच्या;
ते नयनसुख घेऊ कसा?

कलम २ म्हणे
त्याने तिचा पाठलाग केल्यास;
तो अजामीनपात्र गुह्ना;
अन तीन वर्ष सजा!
प्रिये सांग ना;
तुझ्या आठवणीत सदैव मग्न मी;
त्या गर्दीत एखादी निर्भया तर नसेल ना;
अशी भीती मनी बाळगून;
तुझा पाठलाग करू कसा?

कलम ३ म्हणे
त्याने तिला स्पर्श केल्यास;
तो अजामीनपात्र गुह्ना;
अन तीन वर्ष सजा!
प्रिये सांग ना;
मित्र-मैत्रिणी नी सदा बहरलेला;
त्याने तिला, अन तिने त्याला;
नकळत अलगद स्पर्श करून;
स्वर्गसुख अनुभवणारा तो कॉलेज कट्टा;
आता ओसाड पडलेला बघू कसा?

प्रिये सांग ना;
जन्मास पुह्ना यईल का
एखादी निर्भया?
जी शिथिल करील कायद्यातील
त्या कलमा!
अन देईल दिलासा
मज भाबड्या मनाला!

प्रिये सांग ना;
यईल का जन्मास कुणी एखादा अभय?
जो कायद्याशिवाय;
करील समूळ नायनाट;
समाजातील त्या दृष्ट प्रवृत्तींचा!
प्रिये सांग ना!
प्रिये सांग ना!

मिलिंद कुंभारे

« Last Edit: March 19, 2013, 12:22:33 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता