Author Topic: प्रेमाची पहिली भेट!  (Read 2835 times)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
प्रेमाची पहिली भेट!
« on: July 13, 2013, 06:06:10 PM »
प्रेमाची पहिली भेट

तशी ओळख आमची जुनीच होती
पण त्या दिवशी आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .
तिच्या काळजाची हुरहूर, माझ्या मनाला जाणवतच होती .
कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .

कुठूनतरी वाऱ्याची झुळूक हळूच आली होती
तिच्या केसांशी काहीतरी गुज करून गेली होती
सूर्याच्या त्या तेज ऊन्हात ती जणू बाहुलीच दिसत होती
कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .

आमची नाजराला नजर भिडत नव्हती
तिच्या ओठांची सवड अजून काही खुलली नव्हती
पण…. तिच्या सहवासाने मी आणलेली केवड्याची कळी मात्र छान फुलली होती .
कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .

उन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती
चंद्राने हि सूर्यावर कधीच झेप घेतली होती
नाव हि तिच्या बंदराशी पोहचली होती
पण ..... ती अजून वाळूतच खेळत बसली होती
कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .

कारण आठवत नाही, पण त्या दिवशी  ती खूप रडली होती
कदाचित माझ्याच हातांनी अश्रू  पुसावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती .
कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .

                                                               ----------------योगेश इंगळे

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेमाची पहिली भेट!
« on: July 13, 2013, 06:06:10 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 516
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: प्रेमाची पहिली भेट!
« Reply #1 on: July 13, 2013, 07:46:57 PM »
kay khelalas yar shabdansobst tu zakkas  apratim ekdum

:-):-):-):-)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: प्रेमाची पहिली भेट!
« Reply #2 on: July 16, 2013, 10:33:45 AM »
Thanks.

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: प्रेमाची पहिली भेट!
« Reply #3 on: July 16, 2013, 11:17:49 AM »
khup god....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रेमाची पहिली भेट!
« Reply #4 on: July 16, 2013, 01:53:41 PM »
छान .... :)

Offline Pratej10

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Female
Re: प्रेमाची पहिली भेट!
« Reply #5 on: July 16, 2013, 07:33:41 PM »
Nice one :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):