Author Topic: होय ! प्रेम कळलंय मला  (Read 1967 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
होय ! प्रेम कळलंय मला
« on: August 22, 2013, 07:21:51 PM »
होय ! प्रेम कळलंय मला …………संजय निकुंभ
----------------------------
कां रडू मी
अन जाऊ निराशेच्या गर्तेत
तुझ्या प्रेमाचे स्वप्न
कुठे पाहिले होते मी साखरझोपेत

तू तर मला
अशीच भेटली आडवळणावर
दोन फाटे फुटलेल्या
भिन्न रस्त्यावर

जेव्हा भेटलीस तेव्हाच
मार्ग भिन्न माहित होते
पण या वेड्या मनाला
उमजूनही समजत नव्हते

ते तर लट्टू झालं होतं
तुझ्या सुंदर मनावर
खळी पडतांना गालावर
तुझ्या गोड हसण्यावर

तुझ्या वेगळ्या स्वभावाचं
आकर्षण मनाला झालं होतं
मी पडलोच नाही प्रेमात
पण माझं मन गुंतलं होतं

सहवासातला प्रत्येक क्षण
मनात प्रीत फुलवत होता
जाऊ पहातांना मी दूर
तुझा गंध खेचत होता

रोम रोम माझं प्रिये
तुझ्या प्रेमानं भारून टाकलं
जरी अंतर ठेवलं तुझ्यात
प्रेमास पूर्णत्व आहे लाभलं

खोचकपणे विचारतं जग
तुझं प्रेम कुठे आहे
सांगतो या बेधुंद क्षणात
अन माझ्या काळजात आहे

कां सोडून गेली तुला
नको ते प्रश्न करतात
मी इतका आनंदी तरी
ते उगीच हळहळतात

पाहतो मी प्रियेच्या विरहात
कुणी खोलवर डूबतांना
एवढंच म्हणतो मनातल्या मनात
प्रेमचं कळलं नाही यांना

प्रेम भावनेचा खरा स्पर्श
झालायं माझ्या हृदयास
एक वेगळा अर्थ
आलायं माझ्या जगण्यास

म्हणून अश्रूंचा एक थेंबही
पापण्यात कधी येत नाही
तिच्या प्रेमाशिवाय या मनात
कुणालाही थारा नाही

दुराव्यातही बेभान होऊन
जगत असतं माझं मनं
आशेच्या हिंदोळ्यांवर
झुलतं असतं माझ मनं .
=================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २२ . ८ . १३ वेळ : ६.०० संध्या .   
 


Marathi Kavita : मराठी कविता

होय ! प्रेम कळलंय मला
« on: August 22, 2013, 07:21:51 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: होय ! प्रेम कळलंय मला
« Reply #1 on: August 23, 2013, 02:17:46 PM »
that's the spirit of broken heart :) .... prem he ase asave ......... ji vyakti svatahun aaplya aayushyatun without any reason kayamchi nighun geli ahe tyachya sathi radat kai basayach .......... ani ashyanchya aaathavanit apla aayushya kai vaya ghalavayach ........ kharach chhan ahe kavita .....

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: होय ! प्रेम कळलंय मला
« Reply #2 on: August 23, 2013, 11:00:37 PM »
thanx santoshi

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):