माझे शब्द !!!
मी बोलले काही तर म्हणतोस खूप बोलतेस ....
नाही बोलले तर म्हणतोस की का नाही बोलत ....
मान्य आहे मला ... माझे असे वागणे ....
तुलाही कदाचित नसेल रे कळत ....
हट्ट, नखरे.... लाडी, गुडी ....
नाही रे मला जमत ....
छक्के पंजे कसे खेळावेत ...
मला नाही उमजत ....
आशा आहे की माझे मन ओळखशील तू कधीतरी ...
समजेल तुलाही काय दडले आहे माझ्या उरी ....
मी तुला समजायचा प्रयत्न करते आहे....
मनाच्या तारा जुळवण्यात रमले आहे ....
आहे तुझी साथ तर कसली मला भीती ....
हे साथ असताना भेटवस्तूंची किंमत तरी किती ....
कवडी मोल आहेत या सगळ्या वस्तू ....
मनात आहेस फक्त तू आणि तू ....
आजच्या या प्रकटिकल जगात .....
फक्त एकच अपेक्षा आहे ...
थोडेसे जरी तुला माझे मन कळले .....
तरी मला पुरेसे आहे ....
माहित आहे ....खूप चांगला आहेस तू ....
माझ्याहूनही मनाने खूप मोठा आहेस तू ....
पण म्हणतात ना ... ज्याच्यावर प्रेम करतो ...
त्याच्याशीच आपण सगळे बोलू शकतो ....
आता माझे शब्द मला नाही देत परवानगी ....
कारण मी नाही ईतकी पण लहानगी ...
कि उगाच तुला त्रास देईन कुरकुर करून ...
चल आजचा वर्किंग डे वाट पाहतो आहे आपली डोळे लावून.