Author Topic: एकदा तरी तू...!  (Read 6489 times)

Offline sumitchavan27

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Male
    • Marathi Kavita
एकदा तरी तू...!
« on: September 03, 2009, 09:07:05 PM »
तुझे सहर्ष स्वागत करतील फुले,
मोगरा फुलेल, निशिगंध बहरेल,
कमलिनी उमलेल तुला पाहून,
लाजतील फुले भावनाविवश होऊन,
लपतील पानाआड लाजून तुला पाहून,
मात्र सुगंध तुला देत राहतील,म्हणून-

एकदा तरी तू....!
एकदा तरी माझ्या बागेत ये.

एकदा तरी माझ्या बागेत ये.
तुझ्या केसांशी समीर करेल दंगामस्ती,
तुझ्या स्नेहार्द लोचनांनी बहरतील फुले,
तुझ्या सान्निध्याने हसतील पाने,
मंद झुळूकीने शीळ घालतील पाने,
मधुर फळे डंवरतील,तुझ्याकडे झेपावतील
तुला ते तृप्त करतील,
त्या तृप्तीची माधुरी तुझ्या ओठांवर तरळेल,
बाग आनंदाने बहरेल, म्हणून-

एकदा तरी तू....!
एकदा तरी माझ्या बागेत ये.

Marathi Kavita : मराठी कविता