Author Topic: पावसात भेटलेली ती!  (Read 2820 times)

Offline Mayur Lakhadive

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
पावसात भेटलेली ती!
« on: March 17, 2014, 12:01:17 AM »


पावसाची आणि त्याची…जरा वेगळीच मैत्री होती,
जुन्या त्या कप्यात...आठवणीतली ओली छत्री होती!

पावसाच्या संतत धारांशी त्याची ओळख फार जुनी होती,
ती समोरून येउन धडकण्यात पण….बहुदा त्याचीच काहीतरी खेळी होती!

भेट ती पहिल्या पावसातली...जन्मभर पुरणारी होती,
कारण दोघांच्याही हृदयातली धडधड…सारखीच वाढली होती!

तिने भेट म्हणून दिलेली छत्री…त्याला रे अगदीच प्रिय वाटत होती,
ती नसतानाहि तीच…त्याची सखी-सोबती बनून मिरवत होती!

त्याच छत्रीखाली…दोघांची अवखळ नजर भिडली होती!
तिच्या हातात हात घालून फिरताना…हुरहूर मनात वाढली होती!

एकाच छत्रीत फिरणाऱ्या दोघांना...आयुष्यभराची सोबत मिळणार होती,
पावसानेच नकळतपणे…हि जोडी जमवून आणली होती!

कारण पावसाची आणि त्याची…जरा वेगळीच मैत्री होती!

-मयूर
« Last Edit: March 17, 2014, 12:41:14 AM by Mayur Lakhadive »

Marathi Kavita : मराठी कविता


Nikhil Nair

 • Guest
Re: पावसात भेटलेली ती!
« Reply #1 on: April 01, 2014, 01:21:59 PM »
nice Mayur

Offline Mayur Lakhadive

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
Re: पावसात भेटलेली ती!
« Reply #2 on: April 19, 2014, 02:04:40 PM »
धन्यवाद!  :)

Mohit Sonawane

 • Guest
Re: पावसात भेटलेली ती!
« Reply #3 on: April 20, 2014, 10:28:42 AM »
 mast

Offline Mayur Lakhadive

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
Re: पावसात भेटलेली ती!
« Reply #4 on: April 20, 2014, 10:30:56 AM »