Author Topic: तू आलीस...........!  (Read 1876 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
तू आलीस...........!
« on: March 26, 2014, 12:35:47 PM »

तू आलीस वादळासारखी,
प्रेमाचा पाला-पाचोळा घेऊन
अन गेलीस निघून!
तू आलीस वळवाच्या पावसासारखी,
प्रेमाचा शिडकावा करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस वाऱ्यासारखी,
प्रेमाचा अलगद स्पर्श करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस फुलासारखी,
प्रेमाचा सुगंध घेऊन
अन गेलीस निघून!
तू आलीस विजेसारखी,
प्रेमाचा कड-कडात, लख-लखाट करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस पावसासारखी,
प्रेमात चिंब भिजवून
अन गेलीस निघून!
तू आलीस अळवावरच्या पाण्यासारखी,
प्रेमाचे थेंब टाकून,
अन गेलीस निघून!
तू आलीस डोळ्यातील अश्रूंसारखी,
प्रेमाचे अश्रू टाकून,
अन गेलीस निघून!
तू आलीस अन गेलीस निघून,
प्रेमाचे रोपटे लावण्यासाठी,
अशीच येत जा, अधून मधून,
श्री प्रकाश साळवी, दि. २६ मार्च २०१४

Marathi Kavita : मराठी कविता