Author Topic: गुंतले मन वेडे...!  (Read 2312 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
गुंतले मन वेडे...!
« on: October 07, 2014, 08:33:51 PM »
जडला जीव कसा तुझ्यावर,कळलेच नाही
गुंतले मन वेडे का तुझ्यातच,कळलेच नाही!

उमलते जे हास्य तुझे त्या ओठपाकळ्यातुनी
साठवुन ऊरी ठेवायचे, मी कधी टाळलेच नाही !

माळल्या रोज केसात तू ज्या माळा फुलांच्या
हुंगला सुगंध किती,मन अजून भरलेच नाही!

सहवासात तुझ्या गिरवले धडे असे प्रेमाचे
चुकून चेह-याकडे दुस-या, मी पाहिलेच नाही!

गेला नाही दिवस अन् क्षण असा एकही
कि आठवणींनी तुझ्या मला,छळलेच नाही!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता