Author Topic: एक इच्छा .. मला तुझ बाळ व्हायचंय …!  (Read 1673 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
एक इच्छा ..  मला तुझ बाळ व्हायचंय …!

हरवलोय ग स्वतःतूनच ., " मीच " ! माझा …
फक्त तुझ्या आठवणीतच रमतोय .,
पण आता ., जन्मोजन्मी तुज सोबतच रहायचय
अन .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आठवत तुला .. मला तुझी खूप काळजी वाटायची .,
अन ., कुठेही जा पण तू ., माझा हात धरून चालायची .,
पण आज मला ., तुजसवे - तुझ बोट धरून चालायचय ..
 मला तुझ बाळ व्हायचंय …!

तुला माहीत आहे ., तू एक मैत्रीण - एक आठवण आहेस ..
थोडक्यात सांगायचं तर ., माझा जीव - माझ सर्वस्व आहेस ..
पण आता ., मला तुझा एक मित्र - एक सखा व्हायचंय .,
अन यासाठीच .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आज ., न मी तुझा - न तू माझी !
सप्त पदींच्या फेऱ्यांसमोर ., प्रेमही फिक पडलंय !
पण तरीही ., मला तुझ्या श्वासात जगायचय .,
अन आज …  मला तुझ बाळ व्हायचंय …!
फक्त तुझ बाळ व्हायचंय …!

अक्षय भळगट
०१. ०२. २०१५