नेहमीप्रमाणे पावसाळ्यात आज,
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझी आठवण आली...
आठवणींची जागा जणु इंद्रधनुष्यानेच घेतली.
प्रत्येक रंगात दिसणारी तू..
क्षणार्धात दिसेणासी झाली,
बिचार्या त्या इंद्रधनुष्याची जागा ...
काळ्या ढगंनी घेतली...
असं नाही की आठवण आता संपली ||१||
काळ्या ढगांकडे पाहताना आठवण मात्र तुझी होती...
काळ्या ढगांचेही हळु-हळु पाण्यात रुपांतर झाले,
सर दिसते डोळ्यासमोर, आठवण धार म्हणुन उभी राहिली...
हातात धरता धरता मातीत ती विलघुन गेली,
तीच माती आता पहात आहे!
निळ्या निभ्र आकाशात इंद्रधनुची वाट पहात आहे ||२||
(unknown)