Author Topic: तुझ्या येण्याने!  (Read 2287 times)

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
तुझ्या येण्याने!
« on: May 04, 2015, 02:45:02 PM »
तुझ्या येण्याने !

मदनगंध वाऱ्यात मिसळला
प्रणयउमंग अंगात उसळला
दाटल्या कंठाला पाझर फुटला
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
नंदादीप उजळले… तुझ्या येण्याने ।। धृ . ।।

स्पंदनतरंग दरवळले
सप्तरंगांत विरघळले
आतुरलेले मन हरवळले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
शीतल चांदणे अवतरले… तुझ्या येण्याने ।। १. ।।

उजळली कांती कांचनी
लावण्य भरती लोचणी
ऐशा एकांत क्षणी येना जवळ साजनी
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
सप्तसुर नभी विसावले… तुझ्या येण्याने ।। २. ।।

स्वप्न असे की मृगजळ हे
आभास तर नव्हे ना, कैसे मज कळे
मनचातक चिंब न्हाले पहिल्या धुंद सरीने
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
घनामृत बरसले… तुझ्या येण्याने ।। ३. ।।

ती :
मी तुझीच जाहले ज्याक्षणी तुज पाहिले
मिलनाच्या ओढीने मनिमन हरकले
घेना मिठीत सामावून आता सर्व तुज अर्पिले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
मेंदीच्या पानावर नक्षत्र उमटले… तुझ्या येण्याने ।। ४. ।।

तो :
येणा प्रिये तू अशी जवळी माझ्या राहा
न राहील भान कसले अशी डोळ्यांत पाहा
कसे सांगू किती सौख्य मज लाभले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
स्वप्न अंतरीचे साकारले… तुझ्या येण्याने ।। ५. ।।

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com
« Last Edit: May 04, 2015, 02:51:49 PM by sachinikam »

Marathi Kavita : मराठी कविता


नचिकेत

 • Guest
Re: तुझ्या येण्याने!
« Reply #1 on: May 11, 2015, 06:56:47 PM »
सहा महिन्यांनी...


तुझ्या जाण्याने !
किल्ला वाळूचा कोसळला
प्रणयभंग अंगात उसळला
दाटल्या कंठाला पाझर फुटला
दर्दभरे क्षण झाले ठाम तुझ्या निर्णयाने
भंगले मनोरथ माझे तुझ्या जाण्याने

Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: तुझ्या येण्याने!
« Reply #2 on: May 12, 2015, 10:25:31 AM »
very nice Sachin Sir
Its Just My Word's

शब्द माझे!

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
Re: तुझ्या येण्याने!
« Reply #3 on: May 12, 2015, 10:26:40 AM »
Dhanyawad!