Author Topic: विचार कर माझा …!  (Read 1428 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
विचार कर माझा …!
« on: June 12, 2015, 03:04:08 PM »
तु म्हणत असतेस " मी " मित्र आहे तुझा ….!
पण एकदातरी … विचार करून बघ माझा … !

सगळ माहितीये तुला , तरी लय नाटक करते …!
का कोणास ठाऊक ., पण इतका भाव खाते …!
कळलाय तुझा ATTITUDE … बास झाली ना सजा …।
आता एकदा तरी स्वताहून ., विचार कर माझा …!

एकदा मनापासून -  " हो " म्हणून तर बघ ,
गवसेल तुलाही ., तुझ्या स्वप्नातलं जग …!
" हो " म्हणण्यातच बघ, किती असते मज्जा ….
फक्त एकदा मनापासून ., विचार कर माझा …!

नको करू काळजी ., असेन ना मी " सोबती " …!
दुःख हि नाही दरवळणार ., तुझ्या अवती-भवति …!
सुखाचेच क्षण असतील तुला मोजण्या …!
त्यासाठी एकदा तरी ., विचार कर माझा …!

माझ काय " हो " आहे , पण तुझाच निर्णय अंतिम असेल …
खरच सांगायचं तर …, आपलीच जोडी सुंदर दिसेल …!
काहीही ठरवलस तरीही , शेवटी मित्र असेनच तुझा …।
पण जर personally सांगतो ….,
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !

अक्षय भळगट
१२.०६.२०१५

Marathi Kavita : मराठी कविता

विचार कर माझा …!
« on: June 12, 2015, 03:04:08 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):