Author Topic: हि माझी वाट वेगळी !--- बाप्पुसाहेब भोसले  (Read 778 times)

Offline Bappusaheb Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 2
हि माझी वाट वेगळी !
मदमस्त अहंकारी अंधाराला चिरडणारी
द्वेषातून समतेचा सुराज्य उगवणारी
हि माझी वाट वेगळी !
हि माझी वाट वेगळी !
सूर्य उगवत नाही आमच्या वाटी
न्याय मिळत नाही शोषित मानवा साठी
प्रखर होत प्रखर भरारी तूच निर्मित कर
तुझी पहाट !
क्रांती तेज तुज अंगी नको त्या सूर्याची करू प्रतीक्षा
कर्तुत्व महान असे तरी होते उपेक्षा
नको न्यायची करू त यासी  अपेक्षा
वंदन भिमास विचार बुद्धांचे धम्म हाच मार्ग हीच तुझी दीक्षा !
- बाप्पुसाहेब भोसले
« Last Edit: September 26, 2015, 06:47:23 PM by Bappusaheb Bhosale »