पाकळी फुलली पाकळी फुलली
ओल्या ओठांची लाली हि खुलली ……..
सजनी तुझं स्मित पाहुनी
सुर्य बघ तो आडोशाला गेला
पाहुनी तुझी अंगडाई सजनी
मनात माझ्या धडकी भरली
पण बिचाऱया सुर्याची आभा
तुला जळूनी त्याच्यावर रुसली...
हे असे नको ते सजनी
नजरेचे बाण तु सोडले
माझ्या अन् त्याच्यावरही
मी तर तुझाच आहे प्रिये
पण त्याला कशाला
अशी ही भुरळ घालली...
इंद्र धनुष्याचे सारे रंग
आकाशी आज फिके वाटे
तुझ्या रुपाच्या गुलाबी थंडित
गारठलेले ते धुके वाटे
आकाशही आज ठेंगणे झाले
गोड हसण्याची अशी जादु जाहली...
-- सतिश