दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये
एकदा तरी चालत येशील का
जग आज वेगळे असेल तुझे
स्पनांत तरी माझी होशील का...
मी आहेच असा खुळा वेडा
तुझी सदा नुसती गंमत केली
सगळं जग हसतयं माझ्यावर
आज तु हि एकदा हसशील का...
बघ ना खेळु आपण आज
पुन्हा तोच आपला खेळ
अर्धा अधुरा प्रत्येक वेळी
आज तरी पुर्ण करशील का….
माहित आहे मला आज सगळं
ना खेळु शकतं ना येऊ शकतं तु
मीच निरंतर जळता सुर्य दिवसा
रात्रीला तरी चांदणं देशील का….
वाट पाहतोय असाच वेडा बनुन
एकदा तरी वाट चुकशील का
आयुष्य हे असेच चालले निघुन
पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....
पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....
-- सतिश चौधरी