मी तुझी वाट पाहताना तू यावस
अगदी नक्षत्रांनी सजून
पौर्णिमेच्या चंद्राला
तुझ्या मोकळ्या केसात माळून!
मी पाहावे तुझ्याकडे अन
तू माझ्याकडे हळूच लाजून
यावे मी तुझ्या जवळ
तुझा हात हाती घेवून
तू यावस मिठीत माझ्या
मन यावे गलबलून...
मी तुझ्या केसात हात फिरवावा
अन तू लाजावस...
ओठ मिळतील ओठांना
आणि सारे काही विसरून जाव...
तू नि मी फक्त तू नि मी
याव इतक्या जवळ
कि जावा दुरावा संपून ......!
-मित