मा. अॅडमिन,
आपले व मराठी कविताच्या सर्व सभासद मंडळींचे मला ऑगस्ट महिन्याचा "कवि ऑफ द मंथ" खिताब जाहीर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
यशोदे कसा बघ बाई
श्याम तुझा गं मातला
ओलेती तनु कोमल माझी
अन द्वाडाने रंग टाकला …!
अंग अंग माझे जाळती
होळीच्या रंगेल ज्वाला
अंगांगाची झाली काहिली
कान्ह्याने गं डाव साधला …!
गोपाळांचा जमवून मेळा
चहाटळ अडवतो पांदणीला
लोण्याची त्यां लाच हवी
अन रंगाचा तो हाती बुधला ..!
नंदाचा पोर्या गाली हसला
मैय्या मी गं अगदीच भोळा
गोपी सार्या एक होवूनी
उगाच करती मम कागाळ्या..!
माय यशोदा त्रासुन गेली
बांधुन घातले कान्ह्याला
धास्तावल्या गौळणी सार्या
बंधन कृष्णा अन आम्हां कळा …!
विशाल