संध्याकाळी…
जेव्हा जेव्हा…
जुनी वही उघडली जाते,
दुमडलेली पाने…
आपोआपच उलगडत जातात,
पानोपानी…, सापडतात….
सांडलेली आठवांची मोरपीसे…
आणि अलगद निवळतात..
ते निळेशार घनडोह…, तुझ्या डोळ्यांचे!
खरं सांगू…
हे सारं खुप आवडतं, हवंहवंसं वाटतं …
पुन्हा-पुन्हा उलगडावंसं वाटत राहतं …
तू आहेस ना सोबत…
म्हणून…!