Author Topic: प्रेम कविता-गीत-आपलं प्रेम लपून नाही राहिलंय, लोकांच्या लक्षात ते येत राहिलंय !  (Read 221 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 9,386
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही बुधवार-संध्याकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई)           
--------------------------------------------------------------------------

            "आपलं प्रेम लपून नाही राहिलंय, लोकांच्या लक्षात ते येत राहिलंय !"
           -----------------------------------------------------------

आपलं प्रेम लपून नाही राहिलंय,
लोकांच्या लक्षात ते येत राहिलंय !
आपल्याला वाटतंय कुणीच पहात नाहीय,
सर्वांच्याच नजरेत ते येत राहिलंय !

आपलं प्रेम लपून नाही राहिलंय,
लोकांच्या लक्षात ते येत राहिलंय !
आपल्याला वाटतंय कुणालाच कळलेलं नाही,
ते प्रत्येकालाच आता माहीत झालंय !

कळलं, तरी मला काहीही चिंता नाही
कळूदे, मला आता काहीच काळजी नाही
तू मला मिळालीस हेच मोठं आहे, 🚻
माझ्या मनाचं आता समाधानचं झालंय !

तुझ्यावरच माझं प्रेम होत, प्रिये
तुझ्यावरच मी जीव लावला होता, सखे 💘
मला काय करायचंय लोकांचं ?
त्यांना कधी पटलंय का कुणाचं ?

लोक बोलतील, आणि गप्प बसतील 🙇
काही काळ तरी याची वाच्यता करतील
पण आपलं प्रेम सच्च आहे,
आणि ते सदा सर्वकाळ टिकणार आहे .

आम्ही असं काही प्रेम केलंय
प्रेम-मार्गावर आमचं नावच लिहून ठेवलंय 🏞
ते मिटता मिटणार नाही कधी,
ते पुसले जाणार नाही कधी.

आमची शरीरे जरी दोन असली 👩‍ ‍‍👨
तरी आमची मने एकचं आहेत 💑
आमची मतेही आता जुळली आहेत,
आमची मनेही आता जुळली आहेत. 💕

आमच्या प्रेमाची एकचं मंजिल आहे 🏞
आमच्या प्रेमाचे एकचं ठिकाण आहे 🏘
आम्ही एकमेकांचे हमसफर आहोत,
आम्ही एकाचं प्रवासाचे प्रेम-यात्री आहोत.

मग कशासाठी या जगाला घाबरायचं ?
आमचं प्रेम खरं आहे
मग या लोकांची पर्वा का करायची ?
आमचं प्रेम शाश्वत आहे.

जन्मोजन्मी मी तुझाच होतो, प्रिये
आताही आहे, आणि पुढेही असेन
कोणी कितीही बोलले, कितीही हेटाळले,
तरी तू माझी आणि मी तुझाच असेन. 👩‍❤️‍‍👨

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.03.2023-बुधवार.
========================================= 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):