मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, प्रियेच्या रूपाचे वर्णन करणारी कविता-गीत ऐकवितो. "तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही गुरुवार-संध्याकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे- (तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया)
--------------------------------------------------------
"तुला घडविणाऱ्याची कमाल आहे, तो नक्कीच तारीफे काबील आहे !"
------------------------------------------------------------
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
बहुतेक फुरसतमध्येच घडवलंय त्याने तुला,
त्याच्या पारखी नजरेचे हे प्रमाणच आहे !
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
तुलाच का निवडलंय याचाच मला प्रश्न पडलाय ?
याचे उत्तर त्याच्याकडेही नाही आहे !
हा चंद्रासारखI पूर्ण गोल चेहरा 🌝
जणू त्यावर सजल्यात रुपेरी मोहरा
पौर्णिमेचे रूप लेऊन आलाय आभाळी,
शरमिंदा होतोय पाहून सितारा आणि तारा. ⭐️ 🌟
हा काळाकुळीत घनदाट तुझा केश-संभार
सुवर्ण रंगात आलीय त्याला अधिकच बहार
झळाळते तुझी वेणी, जेव्हा तू झुलवतेस,
चमकतेय तुझी बट, जेव्हा तू मान वेळावतेस.
हे निळे निळे गहिरे सागरIसम तुझे डोळे 👀
अंदाजच नाही येत त्यांचा, असे ते उजळे
रोख तयांचा कुणीकडे, कुणास हे नकळे,
जणू काही दडलेलं गुह्य या नयनांत रुळे.
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
तो नक्कीच सौंदर्याचा चाहता असावा,
अन हे लावण्य तुझ्यात घडवत असावा.
मी ठीकच ऐकलं होत लोकांकडून
तेही उघड उघड आणि आडून
आज प्रत्यक्ष पाहतोय मी पडताळून,
भानच हरवलंय साक्षात कयामतीला पाहून.
तुला पाहिल्यावर माझी खात्रीच पटली
तू दिसल्यावर माझी खातरजमाच झाली
खरोखरच त्यांच्या नजरेत तू होतीस अप्सरा,
आता माझ्याही नजरेत तुझी ओळख पटली.
तुझी ही चाल हृदयाचा ठोकाच चुकवतेय 👣
तुझे हे अडखळते पाऊल मला बेभान करतेय
भान नाहीय मला, अशी तू जादूच करतेय,
तुझ्या पावलांत मला ती गुंतवून ठेवतेय. 👣
आणि हृदयाचे काय विचारता माझ्या 💖
त्याचा तोलच सुटत चाललाय जणू
मनाची माझ्या झालीय दोलायमान अवस्था,
दर्यामधले भरकटलेले, चुकलेले सुकाणू. 🚣
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
बहुतेक तो तुझ्यानंतर कुणालाच घडविणार नाही,
बहुतेक त्याला नंतर ते जमणारही नाही.
सकाळची उन्हे पडताहेत तुझ्या गाली
भासताहेत त्यांनी चोरलीय किरणांचीही लाली
सुवर्णासम झळाळतोय तुझा रक्तिम चेहरा,
त्यात भर घालतोय तुझा मुखडा हसरा. 😃
संध्याकाळही काही अगदीच नाहीय निराळी
व्याख्या करतेय तुझ्या रूपाची आगळी
गडद संध्या-छाया तुझ्या केसांशी खेळतेय,
आणि अलगद त्यांना आपल्यात सामावून घेतेय.
लहराती, बलखIती तू एक नदीचं आहेस 🏖
प्रवाहात साऱ्यांनाच सामावून घेत आहेस 🌊
वाटतंय या प्रवाहात निर्धोक झोकून द्यावं, 🏊
आणि तुझ्या प्रवाहाबरोबर वाहत राहावं. 🌊
तुझ्या प्रवाहात बुडण्याची मजा औरच असेल 🏊
तुझ्यासह विहरण्याची मजा अनोखीच असेल
भय नाही, कुठेही नेशील याचे मजला,
बस, सर्वकाही मिळेल न मागताच मला.
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
तुला घडविता तोही आश्चर्यात पडला आहे,
तुझ्या सौंदर्याच्या तोही मोहात पडला आहे.
आजवर मी शोधत होतो माझी मंजिल 🏘
आजवर मी हुडकत होतो माझा ठिकाणा 🏞
मला अवगत नव्हतं, ती इतकी जवळ असेल,
मी अनभिज्ञच होतो, ती माझ्या आसपासच असेल.
आता माझी खात्रीच पटत चालली आहे
या पडद्याच्या पाठी तुझीच छबी आहे
तुझा घुंगट दूर कर तुझ्या चेहऱ्यावरून,
तुझा आंचल हटव तुझ्या मुखड्यावरून.
बघ प्रिये कसा लख्ख उजेड पडलाय
तुझ्या मुख-चंद्राचा रुपेरी प्रकाश फाकलाय 🌝
आजवर अनोळखीच होता तुझा चेहरा,
पहा, अंधार कसा त्वरेने दूर झालाय.
असा आगळा जलवा तू पसरवू नकोस, सुंदरी
अशी मधुप सुरभी तू पखरू नकोस, सुंदरी
बघ, माझंही मन दिवाण होत चाललंय, 💝
तुझ्या सभोवती ते रुंजी घालू लागलय.
तरीही मला ते आवडेल, मला भावेल
माझा वेड मन तुझ्यासाठी मग धावेल 💟
तुझ्या या अंदाजावर पहा ते कसं खुश झालंय,
तुझ्या या अनोख्या अदेवर पहा ते कसं भाळलंय.
असं वाटतं, तुझ्याकडे टक लावून पाहत राहावं 👀
असं वाटतं, तुझं रूप कायमचं डोळ्यात भरून घ्यावं
नजर हटतच नाही प्रिये तुझ्या चेहऱ्यावरून,
तुला घडविणाराही पाहत असेल तुला वरून.
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
एक सजीव पुतळाच त्याने इथे पाठविला आहे,
सौंदर्याचा खजिनाच त्याने तुझ्यात साठविला आहे.
तुला घडविणाऱ्याची कमाल आहे,
तो नक्कीच तारीफे काबील आहे !
त्याची ही बहुतेक अंतिम कलाकृतीचं असेल.
असे लावण्य घडवणं त्याला पुन्हा कधी का सुचेल ?
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.03.2023-गुरुवार.
=========================================