मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, प्रेम रज्जुनी बांधणारी कविता-गीत ऐकवितो. "तुझे जीवन की डोर से, बाँध लिया है, तेरी ज़ुल्म-ओ-सितम सर आँखों पर"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही शनिवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे- (तुझे जीवन की डोर से, बाँध लिया है, तेरी ज़ुल्म-ओ-सितम सर आँखों पर)
----------------------------------------------------------------------
"प्रणय-सूत्रात आपण बांधलो गेलोत, या प्रेमाचे आपण ऋणी आहोत !"
------------------------------------------------------------
प्रणय-सूत्रात आपण बांधलो गेलोत, 💑
या प्रेमाचे आपण ऋणी आहोत !
हे प्रेम-रज्जू इतके घट्ट आहेत, 👍
हे आपल्या आयुष्यभर असेच राहोत !
प्रणय-सूत्रात आपण बांधलो गेलोत, 💑
या प्रेमाचे आपण ऋणी आहोत !
या प्रेमाने खूप काही दिलंय आपल्याला,
तू आणि मी आता एकच आहोत !
आता तुझे दुःख माझे आहे, प्रिये
आणि माझे सुख तुझेच आहे, प्रिये
आपण एकमेकांना सुंदर प्रेम दिलंय,
आपण एकमेकांवर मनापासून प्रेम केलंय.
या प्रेम-रज्जुनी आपण एकत्र आलोत
हे प्रेमाचे चिवट, अतूट धागेच आहेत
जे तुटतI तुटत नाहीत, खंडीत होत नाहीत,
तुला माझ्यापासून, मला तुझ्यापासून वेगळे करत नाहीत. 🚻
तू माझ्या मनी इतकी वसलीस
कुणी अप्सराही मला नाही पाडणार मोहात 👸🏼
तू आता माझी आहेस, माझी झालीस,
कुठल्याही सौंदर्याच्या मी नाही पडणार प्रेमात. 👰🏽
बहकवण्याचा जरी कुणी केला प्रयत्न
तरी तो मी कसोशीने टाळेन
फशी पडण्याचा जरी कुणी केला यत्न,
तरी मी माझ्या मतावर ठामच असेन.
अग तुझ्या नजरेतील प्रेम मला कळतंय 💝
तुझ्या जादूभऱ्या नयनातून ते मला उमगतंय
तुझे डोळे हे जुलमी आहेत, गडे, 👀
त्यात एक अनोखे रहस्य जणू दडे.
तुझ्या या मतवाल्या डोळ्यांच्या नशेत मी आहे
आज या मादक नशेत मी मस्त आहे, चूर आहे
तुझा स्नेह, तुझे प्रेम, मला सर्व विसरावयास लावतोय,
तुझी आपुलकी, तुझा आपलेपणा मला तुझ्याकडे ओढतोय.
माझ्या आयुष्यातील तू एक अवीट कहाणी आहेस
माझ्या जीवनाची तू एक सुरस कादंबरी आहेस
पानापानात, तुझं प्रेमच भरलंय, सखे,
अथपासून इतिपर्यंत ते वाचनीयच आहे, लाडके.
माझं नशीब तूच घडवतेस, प्रिये
माझी नियती तूच रेखाटतेस, प्रिये
तुझ्याच हाती माझे सारे जीवन आहे,
माझे सारे आयुष्य आता तुझंच आहे.
मला तुझ्या रूपाने वेडच लावलंय
तुझ्या तसबिरीला मी सर्वकाळ जपून ठेवलंय 🖼
आठवण आली की ती पहात रहातो,
तुझ्या फोटोतच तू असल्याचा भास होतो. 🖼
तुझ्या रूपाच्या प्रकाशात जणू जग न्हाऊन निघालंय
चंद्र-सूर्यालाही जणू त्यामुळे ग्रहणच लागलंय 🌞 🌝
आभाळात तुझा रूप-तारा तेजाने प्रकाशतोय, 🌟
धरतीला स्व-तेजाने जणू स्वर्गाचे रूप देतोय.
तुझं अस्तित्त्व माझ्या मनात सामावून जातंय
मनाच्या गाभाऱ्याला ते स्पर्शून जातंय
हृदयात प्रेमाचे संगीत निर्माण करून, 💖 🎼
ते अवीट, अमीट असं प्रेम-गीत गातंय. 🎤
तुझी दैदिप्यमान आभा, माझा मार्ग प्रकाशतेय
तुझे झळाळते लावण्य, माझा तिमिर दूर करतेय
तुझ्या चेहऱ्याची झिलमिल, मला माझी मंजिल दाखवतेय, 🏘
तुझ्या पौर्णिमेच्या चंद्रात, मला माझी मंजिल गवसतेय. 🌝 🏞
प्रणय-सूत्रात आपण बांधलो गेलोत, 💑
या प्रेमाचे आपण ऋणी आहोत !
हे प्रेम-रज्जू इतके घट्ट आहेत, 👍
हे आपल्या आयुष्यभर असेच राहोत !
प्रणय-सूत्रात आपण बांधलो गेलोत, 💑
या प्रेमाचे आपण ऋणी आहोत !
या प्रेमाने खूप काही दिलंय आपल्याला,
तू आणि मी आता एकच आहोत !
आता हे प्रेम-रज्जू आयुष्यभर असेच राहतील
जीवनभर ते आपल्याला एक-सूत्रात गुंफतील
तुला आणि मला ते जीवनभर एक करतील, 👩❤️👨 🚻
याचं काय, पुढील आयुष्यातही ते भक्कमच राहतील.
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2023-शनिवार.
=========================================