मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, राजा-राणीची प्रेम-कहाणी कविता-गीत ऐकवितो. "ओ नी सुल्ताना रे प्यार का मौसम आया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही बुधवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे- (ओ नी सुल्ताना रे प्यार का मौसम आया)
----------------------------------------------------
"प्रेमाचा मौसम आलाय राणी, मला तुझ्यासवे गायचीत प्रेम-गाणी !"
---------------------------------------------------------
प्रेमाचा मौसम आलाय राणी, 👸🏼
मला तुझ्यासवे गायचीत प्रेम-गाणी ! 🎤
बहर आलाय, बघ कसा बहरून गेलाय,
फुलांनी भरून गेलीय आपल्या प्रेमाची फुल-दाणी ! 💐
प्रेमाचा मौसम आलाय राणी, 👰🏽
मला तुझ्यासवे गायचीत प्रेम-गाणी ! 🎤
आपले प्रेम जणू उतू चाललेय,
पाहून कश्या जळताहेत तुझ्या मैत्रिणी !
हिरवीगार वनराई सर्वत्र डोलतेय 🌳🌴
तिची हिरवी सावली नेत्रसुख देतेय
निसर्ग मुक्त हस्ते उधळतोय सौंदर्य,
आज आपल्या प्रेमाला उधाणच येतेय. 🌊
तू नाही बोललीस तरी हरकत नाही
तू नाही हसलीस तरी फरक पडत नाही
अगं तुझ्या बांगड्याच बघ बोलताहेत,
खणखण करीत मला त्या खुणावताहेत.
प्रेमाच्या त्या खाणाखुणा सांगत आहेत
मध्येच हळुवार उखाणा त्या घेत आहेत
खनकत माझं लक्ष त्या वेधून घेताहेत, 👀
प्रेमाचा मौसम आलाय, मला त्या सांगताहेत.
जणू त्या माझ्याशी गुजगोष्टी करताहेत
मध्येच तुझी कागाळी मला सांगताहेत
त्यांची किणकिण माझ्या कानांना लुभावतेय,
मला तुझ्याकडे त्या ओढून नेताहेत. 🚸
होय राजा, तू म्हणतोस ते खरं आहे
हा आलेला आपल्या प्रेमाचा बहर आहे
त्यात तुझा नुसता उठता बसता कहर आहे,
पण मला तुझा हा प्रेम-शिष्टाचार आवडत आहे.
प्रेम-गीत गाऊन तू मला मोहवीत आहेस 🎤
उत्कट स्पर्शाने माझी काया थरकावीत आहेस 🚻
मिठीत घेऊन माझ्या कानी काही सांगत आहेस, 💑
माझ्या गाली लज्जेचे गुलाब फुलवीत आहेस. 🌹
तुझ्या या अतीव प्रेमाने माझे मन मोहिले आहे
तुझ्या या प्रेमाने मलाही उत्स्फूर्त गीत सुचविले आहे 🎼
मी गातेय, सख्या, तुही मला साथ दे, 🎤
हा बहर बहरू दे, पुन्हा पुन्हा येऊ दे.
आज तुझं प्रेम मिळालं, मी निश्चिन्त झाले
माझे उदास नयन तुला पाहून हसू लागले 👀 😊
आज तू माझा झालास, मी सर्व भरून पावले,
या मौसमने माझे सारे नवसच पूर्ण केले. 👍
सखे, हा मौसम पुन्हा पुन्हा यावा
तुझ्या माझ्या प्रेमाला हा बहर द्यावा
या राजाची राणीच आहेस तू, 🤴👸🏼
आपल्या प्रेम-कहाणीचा नवा अध्याय सुरु व्हावा. 📚
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.03.2023-बुधवार.
=========================================