कल्पना.....!
[/size]
ㅤ
[/size]
कशी मान वेळावुनी लाजताना
[/size]
मना माझिया वेड हे लावते तू,
[/size]
उगा झाकुनी पापण्यांची कवाडे
[/size]
हळू पाहता संभ्रमी टाकते तू..
[/size]
ㅤ
[/size]
जरी चालशी चोरट्या पावलांनी
[/size]
तुझ्या चाहुलीने असा कंप होतो,
[/size]
मनी गांगरावे, न काही सुचावे
[/size]
दिसेना तरीही तुझा भास होतो..
[/size]
ㅤ
[/size]
तुझा केशसंभार जादूगिरी ही
[/size]
असूनी खुला तो मना गुंतवीतो,
[/size]
कधी केस ओले, हवा आर्द्र होते
[/size]
सुगंधात झोका मना गुंगवीतो..
[/size]
ㅤ
[/size]
तुझे गाल गोरे, परी त्यावरीची
[/size]
खळी का असे हीच तक्रार आहे,
[/size]
खिळूनी बसे दृष्टि तेथे पुन: ती
[/size]
ढळेना म्हणूनीच बेजार आहे..
[/size]
ㅤ
[/size]
नसे लक्ष माझे तसे वेधण्याला
[/size]
उगा येरझाऱ्या कशी मारते तू ?
[/size]
कधी एकटी पाहुनी मी खुणावी
[/size]
बहाणा नवा शोधुनी टाळते तू..
[/size]
ㅤ
[/size]
उगा अंगठ्याने भुई टोकरावी
[/size]
उगा ओढणी सारखीशी करावी,
[/size]
तुझे गोड चाळे पहाणार नाही
[/size]
अशी पैज माझीच मी का हरावी ?
[/size]
ㅤ
[/size]
अशी कोण वाटेत आलीच नाही
[/size]
कधी मी कुठे पाहिलेलीच नाही,
[/size]
उगा स्वप्न ऐसे मनी राहिले ना
[/size]
तरी मी कवी शब्द गुंफीत राही...!
[/size]
ㅤ
[/size]
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(भुजंगप्रयात)
[/size]
- स्वामीजी १८-१२-२०१०