बघ राहूनच गेल....!
ओल्या वाळूत चालताना ...
हाताला स्पर्श करता करता ..
हात हातात घ्यायचं बघ राहूनच गेल..!
पुळनित घर बांधताना ...
एक मस्त सुंदरस घरट....
बघ घ्यायचं राहूनच गेल...!
एकमेकांच्या डोळ्यात बघताना..
एकाच फोटोत दोघाना एकत्र ...
बघायचं बघ राहूनच गेल...!
जाउदे ग ..लग्न झालय आता ..
डोरलं बांधलंय..ना ...
चोरून प्रेमाची मजा लुटायच बघ राहूनच गेल !