तो : सर्वे काही तुझ्यासाठी , पौर्णिमेचा चंद्र , उगवता सूर्य
जे मागशील ते देईन
किरणांची रंगत , चांदण्यांची संगत
करून देईन
तू माझी राणी अल्लड मनी
माझ्या प्रीत्फुला
तुझ्या अंगणीचा सोनचाफा
व्हायचं मला ,
ती : मी हि तुजीच रे तुजवीण अधुरी
कधी आपली भेट जुळावी
तुझ्या मिठीची ओढ सजना
न कुणा हि प्रीत कळावी .
मज तुजीच आठवण
तू येशील कधी रे
नको वेळ दवडू आता
नको उशीर करू रे
तो : जगतो तुझ्याच साठी
तुला मिळवण्यासाठी
शर्थ करतो दुनियेशी
तुझ्या प्रेमासाठी
एक दिवस असा येईल तू माझी असशील
फक्त माझी .
मैत्रेय