ए, बघ ना जरा
अशी रागावु नको ना!
घडला काय गुन्हा?
अशी जाऊ नको ना!
थोडा ऊशिर झाला,
बघ ना पाऊस आला,
ट्रेन लेट होत्या
अन तुझा फोन आला
खुप गर्दी होती
उभं राहायला जागा नव्हती,
कसा तरी ऊभा होतो,
अन् तु कॉल करत होती
शेवटी कसा बसा पोहचलो
तडक तुला भेटण्या आलो
तु तर रुसलीस
अशी गप्प बसलीस
सोड ना, हा अबोला
मी तुझ्याविना अधुरा
सखे, बघ ना जरा
अशी रागावु नको ना!
मैत्रेय(अमोल कांबळे)