आज नकळत आठवत गेलो ते क्षण,
पाहत राहिलो त्या पाऊलखूणा आठवणींच्या..
पुन्हा नकळत आठवले ते सुख-दु:खाचे क्षण,
विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना पुन्हा जोडतो आहे स्वत:शीच,
आणि त्या क्षणांची गोळाबेरीज स्वत:च करतो आहे.
काळात विरलेल्या आठवणींच्या धाग्यांना विणून,
जून्या नात्यांना पून्हा नव रुप देतो आहे मी.
आणि ज्या मागे उरल्या होत्या त्या आठवणी,
पुन्हा आठवतोय मी...
-गौरव कनसे