तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..
-- Author Unknownहि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.