Author Topic: रात्र चांदण्यांनी सजलेली ...!  (Read 1482 times)

रात्र  चांदण्यांनी सजलेली
 
 त्यात  तुझे   रूप  मी पहिले
 
 क्षणभर  विश्वास  नव्हता  नजरांना
 
 माझी प्रेयसी  आज  माझीच  जाहली
 
 मग तुझे मिठीत  घेणे  मला
 
 आपलेस करून घेणं
 
 सुरुवात होती  नवीन आयुष्याची
 
 तुझ्याच  सोबत  जगणं

अन  तुझ्याच  समोर 
 मरणं...
 
 रात्र  ती चांदण्यांची  अशी काही  सजलेली
 
 तू अन  मीच  जागी होतो
 
 हे  जग  होते   निजलेली..
 
 -
 © प्रशांत शिंदे