Author Topic: तुझ्या माझ्या प्रेमाला !  (Read 1801 times)

तुझ्या माझ्या प्रेमाला

ही दुनिया आज हसते

मी तुला शोभत नाही सांगुन

जरा जास्तच हसते

मग ..??

माझा हात धरुन त्यांना तु सांगते

तेव्हा सारे पळुन जातात

कारण खरे पटत नसतं

खोटंच त्यांच जवळचं असतं

तुझे माझे प्रेम पाहुन

मी शब्दांमध्ये मांडतो

त्यांना कळत नाही

प्रेम हे ह्रदयाशी होत असतं

ते ना काळे ना गोरे असतं

ना तिचं वय ना रुप पाहतं

तरीही ते सोबत आयुषभर असतं....

म्हणुन तर दुनियेला हसु येत असतं

तरी दुनियेला झुगारुन

आपण प्रेम करत असतो..
-
© प्रशांत शिंदे