Author Topic: $$$$ फक्त खर प्रेम असावं $$$$  (Read 1203 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$$$ फक्त खर प्रेम असावं $$$$

क्षणभर न्याहाळता तुला
वाटत तुला आणी तुलाच पाहत बसावं
तुझ्या नयनांशी क्षण-न -क्षण
नजर भिडवून मुक्या भावनांना जोपासावं

प्रेम म्हणजे काय हेही
तूच मला ते टप्याटप्यान  शिकवावं
मीही तुझ्याच प्रीतीचे रंग ढवळीतो
तू हि थोड मला प्रेमात साथ घ्यावं

अजुनी अधुरच आहे जीवन माझ
तू माझ्या जीवनी येवून ते परिपूर्ण करावं
नसावे कोणतेही वाडे त्यात
फक्त आणि फक्त खर प्रेम असावं

तूच  लाविली प्रेमाची गोडी
वाटत सोबत तूच तू असावं
तुझ्याच प्रेमात मी न्हाव
अस आणि असच आपल प्रेम असावं

                                        विजय वाठोरे सरसमकर
                                            9975593359