Author Topic: $$ मन तरसतय आज खूप .........  (Read 1791 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$ मन तरसतय आज खूप .........
« on: September 25, 2015, 08:50:12 AM »
 $$  मन तरसतय आज खूप .........

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास
तू नसताना खूप सतावते तुझी आठवण
अधीर मन माझ धावत तुला शोधण्यास !

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास !

क्षण-ना-क्षण रहायचं होत तुझ्यासोबत
मनाने मनाशी हितगुज करण्यास
थोड तुझ थोड माझ मन हलव करून
भटकत्या भावनांना वाट करून देण्यास !

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास !

आज खूपच खचलंय हे हृदय
तू नाहीस म्हणून गर्क असत तुझच स्वप्न पाहण्यास
तुजवीन जगतोय कसातरी मन मारून
आताशीच कुठ जाणलंय का घाबरतात प्रेम करण्यास !

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास !

तू तूच होतीस जीवनात माझ्या
मनाच्या मंदिरी आशेची ज्योत पेटवण्यास
तुझ्यावीण श्वासही नाही वाटत घ्यावासा
हि ज्योत फडफडतेय आज विझण्यास !

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास !

कविमन माझ ओढल जात तुझ्याकडे
हळूच होतात तयार शब्दही तुझ्यासाठी जुळण्यास
माझ्यासाठी रात्रही पुरत नाही
तुझ्यावरती स्वछंद कविता करण्यास !

मन तरसतय आज खूप
तुझी एक झलक पाहण्यास !
तू नसताना खूप सतावते तुझी आठवण
अधीर मन माझ धावत तुला शोधण्यास !

                                             कवी :- विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
                                                      9975593359

Marathi Kavita : मराठी कविता


adesh kumar

  • Guest
Re: $$ मन तरसतय आज खूप .........
« Reply #1 on: February 27, 2016, 06:35:43 AM »
Khupach chan kavita ahe.ekdam bhari.