Author Topic: $ आठवत तुला ..... $  (Read 1030 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$ आठवत तुला ..... $
« on: June 26, 2015, 07:52:53 AM »
 $  आठवत तुला ..... $

आठवत का तुला तू माझ्या
प्रेमाच्या पावसात न्हातांना
माझ्यासाठीच तुझ ते
सर्व हरवून बसतांना

माझ्यासाठी तू या विश्वात
स्वार्थीपणा विसरताना
तू कधी पाहिलंस का
मला आपलस करणाऱ्या भावनांना

तुझ्या स्पर्शाची चाहूल देणाऱ्या
या झुळूक वाऱ्यांना
सगळ्याच गोष्टी अदृश्य असतांना
हृदयीचे ठाव घेतांना

हृदयस्त जसजसे होतेस तू
तसतसे मनात रुजत असतांना
आयुष्य हे एकदाच मिळत
म्हणून प्रेम करतांना

आठवत तुला तुझ ते मुरडण
मला ना म्हणून होकार देतांना
तुझ्या या करुणामय मनाने
प्रेम करण आवडतांना .

                  विजय वाठोरे सरसमकर
                  ९९७५५९३३५९

Marathi Kavita : मराठी कविता