Author Topic: "हिच" बायको हवी...!!! ©चारुदत्त अघोर  (Read 3062 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"हिच" बायको हवी...!!! ©चारुदत्त अघोर(३०/६/११)
कधी कधी वाटतं,देव अशा चुकीच्या जोड्या का बनवतो?
ज्याला शांतता प्रिय असते,त्यालाच बायकोची कटकट का सुनवतो;
खरंच वाटतं या पेक्षा आपल्याला,अझून चांगली जोडीदार मिळाली असती,
काहीच अडलं नसतं,जर हि आपल्या आयुष्यात नसती;
हि आपली आयुष्यात आली,हीच आहे एक मोठी चूक,
कारण कधी मला समजूनच घेत नाही,न समजत माझी भूक;
मन सैरावैरा पळतं,कि जी आपल्याला रीस्पोंस देते,तिला जवळ करावं,
पण सौन्स्कार आड येतात, नको ते झालं,तर कोणी निस्तरावं?;
पण स्वप्नी सुद्धा तीच येते,जिच्यावर मन घोळतंय,
आतल्या आत गुदमरून,द्विधा मनी पोळतंय;
याच विचारांनी संतापात,अंगी ताप चढला,
सुस्तावून पडलो,झोप लागली,तरी अझूनच वाढला,
"हि"नौकरी वरून अझून आली नाही, म्हणून पाहत होतो वाट,
मनी असलेले स्वप्नं दुरावून, झाले होते चक्क…भुई सपाट;
पुन्हा हि आता येईल, मग येईल, म्हणून विचारातच निजलो,
डोकं त्या विचारांनी भरलं होतं,म्हणून विचारांती वीजलो;
नकळतच एक मऊ हाथ तळवा,माझ्या कपाळी फिरला,
थर्मामीटर घालून माझ्या शर्टात,बाहू-काखी शिरला;
पुन्हा काही वेळा नंतर,गार पाण्याच्या पट्ट्या कपाळी भिजल्या,
त्या प्रेमळ फिरत्या हातांनी,तापित भावना निजल्या,
थोडी जाग आली तर,माझे पाय दाबत असता,दिसली…"हिची" छवी,
लज्जित झालो त्या प्रेमाला..,देवा..!मला सात जन्म,……"हिच "बायको हवी...!!!
चारुदत्त अघोर(३०/६/११)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
nice ....... i like it very much ..... specially ending khupach chhan vatala .....  ushira ka hoina pan baykoche mahtva tumhala kalale :D