Author Topic: ""आधण."  (Read 2063 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
""आधण."
« on: January 06, 2011, 01:36:30 PM »
II ओम साई  II
""आधण.""
थंडी कडाडलेली,कारण जानेवारीचा महिना,
कितीही आवरलं,तरी मन काही ऐकेना;
मी पांघरुणात व हाती रोमेंटिक पुस्तक,
जे वाचून,प्रेम भावनेने वादळीत झालं मस्तक;
सरळ माणसाला बेधुंद करणे हिच लेखकाची खुबी,
रंगीत पणाने तुला वेधले,तर तू ओट्याजवळ एक पाय मोडून दुसर्यावर उभी;
त्याच क्षणी पांघरुण फेकून,मांजर पावलाने येऊन तुला घट्ट कवटाळले,
अनपेक्षित माझ्या उबदार मिठीने,तुझे बेसावध डोळेच बावचळले;
थोडी प्रेम रागाने ओरडलीस,कारण ग्यास वर ठेवलं  होतं चहाचं आधण,
उतू जाईल म्हणून सोडवत होतीस स्वतःला,करत माझ्याशी भांडण;
एवढ्या गुलाबी थंडीत मिठीतून सोडवत नव्हते,म्हणून तुला हातात उचलली,
आणि धावत तुला हात्कुशीत घेऊन,सरळ आपली खोलीच जवळली;
खरच,त्या क्षणी वाटलं तुला मिठीतून कधीच सोडू नये,जरी कितीही पालटले ऋतू,
आठवतं...?त्या दिवशी एक ग्यासवर आणि दुसरं पांघरुणात,असे दोन आधण गेले उतू......!!!!!
चारुदत्त अघोर.(दि.६/१/११)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline स्वप्नील वायचळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 182
 • Gender: Male
Re: ""आधण."
« Reply #1 on: January 06, 2011, 02:29:15 PM »
chhan kalpana keli ahe tumhi
mast ahe
keep it up

Offline Prachi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 206
 • Gender: Female
 • हसरी :-)
Re: ""आधण."
« Reply #2 on: January 06, 2011, 05:39:08 PM »
liked it!!!!!! awesome...... :)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: ""आधण."
« Reply #3 on: January 08, 2011, 10:30:46 AM »
aavadli kavita !! khupach chhan aahe!!