Author Topic: "राधा"  (Read 1654 times)

Offline adnils

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Male
  • www.adnils.weebly.com
"राधा"
« on: December 09, 2014, 02:48:15 PM »
"राधा"
आज राधा होती एकटी
अगदि कान्हा सोबत असताना
छळत होता सहवास त्याचा
अगदि कोणी तिथे नसताना II
रागावली होती आज ती सख्यावर
कितीतरि दिवसानी आज तो भेटला होता
ज्या वेणुने वेड लाविले होते त्याचे
त्या वेणुच्या सुरात तिला तो सापडत नव्हता II
आज नाहि भेटायचे त्याला,
तिने ठरविले होते...
आज माघार नाहि घ्यायची,
हेच धडे मनाच्या पाटिवर गिरविले होते II
राग हि फसवा होता तिचा
हे त्याला भेटल्यावर कळले..
मनाने हि माघार घेतलि तिच्या
पुन्हा तिचे पाय त्याच्याकडे नकळत वळले II
तुच तर माझी सखी, तुझाच मी ..
कानात सांगितले कान्हाने जेव्हा..
अलगद खळि खुललि गालावर तिच्या .
घेतले ओढुन मिठि त्याने जेव्हा II
'राधा' कसे समजावु तुला
माझे प्रेम तुझ्यावरचे..
किती अनमोल आहेत मला
हे ओघळणारे अशृ गालावरचे...II
माझ्या प्रत्येक श्वासावर हक्क तुझा
तुझ्याचसाठि माझे हे जगणे आहे....
निरर्थक असेल तुझ्याशिवाय हे जग
आठवणीत हि तुलाच बघणे आहे...II
नको दुरावु पुन्हा तुझ्यापासुनि
अबोल तुझा हा चेहरा छळतो मला ..
राग तुझा तसा फसवा आहे
गोड तुझा हा राग कळतो मला...II

(निलेश-6.12.14)

« Last Edit: December 09, 2014, 02:49:50 PM by adnils »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female
Re: "राधा"
« Reply #1 on: December 09, 2014, 05:19:49 PM »
nice :)

Manisha A.

 • Guest
Re: "राधा"
« Reply #2 on: December 12, 2014, 09:25:22 PM »
I Like This So Much Bcoz Same Story Of Me And Radha