Author Topic: "तुझ्या विना सखे....!!" (चारुदत्त अघोर.(२६/३/११)  (Read 2164 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"तुझ्या विना सखे....!!" (चारुदत्त अघोर.(२६/३/११)

तू नव्हतीस तेव्हा जगलो,
तू नाही तर कसा जगु?
जगत्रयी वेधीत नजरी,
तुला सोडून कोणास बघू?
तुझ्या संगतीची औरच ती ताकत,
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

बालपणातून पौगुंडीत चाललो,
त्यातून धडधडत,तारुण्यात पाउललो,
गुळगुळीत मातीतून, गवती बहरलो;
ओल्या स्वप्नी,मोहरून शहारलो,
कसा तारुण्याचा ताठा,जो कधीच नाही वाकत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

कशी असशील तू या विचारी रंगलो,
शिग्या उत्सुक्ती, ताणून तंगलो;
पुष्टीत देही रसरसून फळलो,
पुरात यौवनाच्या, थेंबी गळलो;
कधी येशील माचायला,बसलो वाट बघत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

दिसली त्या दिवशी,सर्वस्व हरलो,
रिकाम्या आनंदी, तुडूंब भरलो;
कोणीच नव्हते माझे, तेच स्नेही समजलो,
खर्या अर्थाने परक्या, दुनियेस उमजलो;
उणे,भागाकारी-गुणवून, अधिकास बसलो आखत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

सनई चौघडी अंगी अंगी, स्वरून नादावलो,
दिवस संपून, रात्रीच्या आगमनी कातावलो;
सुकल्या ओठी,ओठावून ओल त्या ओठी ओलावलो,
सर्वार्पण करून त्या मोहक अंधारी,खोल खोली खोलावलो;
त्या मधुर रसा पुढे,कोणत्याही रसाचा, थेंबहि नाही धकत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

त्या मोगर्या गजरी गुरफटून बेभान वारावलो,
खुल्या केशी सावली थंडावून,रसनी पारावलो;
मातल्या चंद्री,ओथंबून रसाळ फळी उतू गेलो,
रात्र रणी,जिंकल्या बाजी,दमत शितावलो;
बसलो मोजत ठोके,होते जे हृदयी ठोकत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

दिस गेले,महिने गेले,गेले वर्ष विसरलो,
निश्चिंत तुझ्या संगतीत,आळसून पसरलो;
तारुण्य उंबरठा पारवून,मध्यांनी वयी आलो,
तुझ्या 'ए' म्हणण्यातून प्रौढवून, कसा आज 'अहो' झालो;
हीच तर त्या संगतीची गोडी,जी सदैव वाटते चाखत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

असंच सोबत चालूया कि वाटावं खरं जीवन जगलो,
मैल उर्त्या आयुष्याचे गाठू आधारत,जरी वाटलं थकलो;
नाही घालवायचा असा एकही क्षण,जो बिन तुझ्या मुकलो,
चेतानारूपी तू काठी माझी,ढिलावू नकोस पकड,जरी मी वाकलो;
थोडा जडावतोय श्वास,अंधुक नजर चालली आहे थकत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!

थकू नकोस मनोबली तू,जरी न मी राहिलो,
एक समर्पित पुष्पं,जे तुझ्या हातून वाहिलो;
माझा खोडसाळ पणाच तुझी ताकत,जरी कुठे मी चुकलो,
काही थेंब रक्ती,काही श्वास भाती,उरवून थोडा सुकलो;
तुझ्याच हृदयी राहिन,नको अश्रू गाळूस,ते तुला नाही शोभत;
खरंच,तुझ्या विना सखे,मी जगूच नाही शकत...!
चारुदत्त अघोर.(२६/३/११)