Author Topic: "आता.....फक्त...........!!" ©(चारुदत्त अघोर -७/६/११)  (Read 2063 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"आता.....फक्त...........!!" ©(चारुदत्त अघोर -७/६/११)
खूप खूप प्रवास केलेत,काय राहिलंय बघायचं,?
आता फक्त तुझ्या पदरी पकडत, खेटूनच राहायचं;
नको त्या गाड्या,ती वेळापत्रक,ते नुसतं धावायचं,
आता फक्त तुझ्या सावलीत,वसून गावायचं;
किती मनधरण्या लोकांच्या करायच्या,किती भांडायचं,?
आता फक्त तुझ्याशीच,उर्वरित राग-लोभ सगळं, सांडायचं;
रोजचे धक्के खात,मोटारीच्या खिडकी निजायचं,
आता फक्त मखमली रात्र अंधारून, तुझ्याच कुशी विजायचं;
रोज घडल्या आठवणी का मीच,एकटेपणी आठवायचं,?
आता फक्त गाठी, सौन्सार गाठवून,जीवन गाठ्वायचं;
तो मोगर्याचा गजरा दिसला कि,का विचलित मनाला आवरायचं,?
आता फक्त हर टप्पोरी कळी गंधत, मदन बनून, बाणी नवरायचं;
सगळ्या जपलेल्या त्या शहारीत आठवणी,का स्मरून काटायचं,?
आता फक्त शहारलेल्या अंगी काटवून, स्वतःस तुला,मिठीत वाटायचं;
नुसते विडे चावून,सीगारेट ओढून,किती टपोरी पणे,टपरी बसायचं,?
आता फक्त रसाळ केशर पानी,एकाच विडी दोघं,चार ओठी रसायचं;
नाही क्षण वाया घालवायचे,नाही चिडायचं,ना कोपायचं,
आता फक्त हर रात्र सखावत,रात खेळी थकून,तुझ्या मांडी झोपायचं... !!!
चारुदत्त अघोर (७/६/११)