Author Topic: "अनोळखी नजरा...!"  (Read 1526 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"अनोळखी नजरा...!"
« on: January 30, 2012, 11:49:12 PM »
:-* "अनोळखी नजरा...!" :-*  :-* अनोळखी त्या नजरा दोन, ओळख शोधू पहात होत्या... :-* वाचून डोळे, एकमेकांच्या मनामध्ये रहात होत्या... प्रवास होता साताजन्मांचा, सुरुवात हळूच करत होत्या... विसरून सा-या जगांस दोघी, सहवासात रमत होत्या...
 
:-* अनोळखी त्या नजरा दोन, ओळख शोधू पहात होत्या...! :-*
 
 अबोलीची सांडून फुले, गुलमोहोर ओंजळीत घेत होत्या...
 होऊन गुलाब क्षणाक्षणाला, केवड्यापरी दरवळत होत्या...
 निमिषभर विरहातसुद्धा, लाडे सुखावत सलत होत्या...
 लागता ठेस एकाला, दोघी बाव-या विव्हळत होत्या...
 
:-* अनोळखी त्या नजरा दोन, ओळख शोधू पहात होत्या...! :-*
 
 भावना सुप्त अंतरीच्या, शब्दफुलांत उधळत होत्या...
 नजरानजर होताचक्षणी, लाजाळू होऊन गळत होत्या...
 भेटीगणिक मनोमनी, कळ्यांसवे खुलत होत्या...
 टळता भेट वळणावरच्या, वाटेवर त्या रुळत होत्या...
 
:-* अनोळखी त्या नजरा दोन, ओळख शोधू पहात होत्या...! :-*
 
 मिटून पापण्या लोचनांच्या, स्वप्ननगरी सजवत होत्या...
 साखरझोपीं स्वप्नसुमने, शीतल दवांत भिजवत होत्या...
 होता पहाट सूर प्रेमाचे, पुन्हा नव्याने आळवत होत्या...
 शुभ्रकरांतून दिनकराच्या, भाव मनीचे कळवत होत्या...
 
:-* अनोळखी त्या नजरा दोन, ओळख शोधू पहात होत्या...! :-*
 ...........महेंद्र
:-*

Marathi Kavita : मराठी कविता