Author Topic: "शांत किनारा...!  (Read 2477 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"शांत किनारा...!
« on: November 08, 2011, 08:12:32 PM »
:-*"शांत किनारा...! :-*"
शांत ऋतू हा... शांत वेळ ही... नभी शांत तेव तारे...
तरीही अलगुज करीत कुणाशी घोंगावतात वारे...
टाहो फोडत मिलनास जणू आन्क्रंदिले किनारे...
समुद्र शीतल पांघरावया उत्सुक वाळूचे निखारे...!
:-*"शांत ऋतू हा... शांत वेळ ही... नभी शांत तेव तारे...!" :-*

शीळ वेळूचे क्षणात उठवी अंगावरी शहारे...
रातकिड्यांची किरकिर बसवी रातीतही पहारे...
आठवांची उगाच मैफिल सजवतात हे नजारे...
अलवार् प्रीतीचे गंध लेवुनी रानकेवडा तरारे...!
:-*"शांत ऋतू हा... शांत वेळ ही... नभी शांत तेव तारे...!" :-*

मन वेडे माझे अशात पळपळ  तुलाच पुकारे...
आभास तुझा, ह्या दास तुझ्या देतो पहा पिसारे...
मग दवासवे मधुस्पर्श तुझा दावी रूप ते बिलोरे...
सताड उघड्या डोळ्यांनी पाही मी स्वप्नांचे मनोरे...!
:-*"शांत ऋतू हा... शांत वेळ ही... नभी शांत तेव तारे...!" :-*
                                                                                ...........महेंद्र :-*

Marathi Kavita : मराठी कविता