Author Topic: "माझ्या स्वप्नाची राणी"....!!  (Read 2317 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
पहाटेचा मंद वारा सुटला,
मनाच्या प्रितीला अंकुर फुटला...
अन् पहाटेच्या दाट धुकेत,
माझ्या मला कुणीतरी भेटला....

तुझ्या रुपाचं चादंण पाहताच,
वेडा चंद्रही आज खाली झुकला...
अन् नभात दाटलेल्या ढगाच्या,
आडोशाला जाउन तो लपला....

तुझ्या डोळ्याची बेधूदं नशा,
करी माझ्या जीवाला वेडापिसा...
जणु सागराच्या डोहात वाहणारी,
विशाल सागराची जलपरी मासा....

तुझ्या केसाचा अंबाडा सुटताना,
हवेत हळूच गारवा सुटायचा...
जणु विस्कटलेल्या केसातूनी,
सुगंध हा मोगर् याचा खुलायचा...

गालातल्या गालात हसायची,
सारं निसर्ग खुलून उठायचं...
जणू मन फुलपाखरु बनून,
बेभान निसर्गात उडत सुटायचं....!!

--------------- ----------------
स्वयं लिखीत:-
स्वप्नील चटगे.
« Last Edit: April 21, 2014, 11:49:27 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


RAAHUL

 • Guest
Re: "माझ्या स्वप्नाची राणी"....!!
« Reply #1 on: April 19, 2014, 06:40:17 PM »
superbbbb...........khupppppp chhhaaaaannnnnn..........

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: "माझ्या स्वप्नाची राणी"....!!
« Reply #2 on: April 21, 2014, 12:15:19 PM »
Thanks A Lot Rahul....!!