Author Topic: "बंद पापण्या" ...!!चारुदत्त अघोर.  (Read 1970 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"बंद पापण्या" ...!!चारुदत्त अघोर.(१५/५/११) 
सहज तुला पाहता आज, दृष्टी तुझ्या डोळ्यांवर गेली,
जसं लक्ष सारं हरवून,जुन्या आठवणीत चित्त नेली;
ह्या डोळ्यानीच तर कधी मला, पार हरवून टाकलेलं,
माझं अवघं आयुष्यच जसं त्या पापण्यात,झुकून वाकलेलं;
किती पारदर्शी ते आरस काची जग समावणारे डोळे,
सगळ्या वजनी जड पारडी,जसे फिक्के सोन्या-चांदी तोळे;
याच डोळी मी बघितलेला,पौर्णिमी चंद्र, लांब… रात्री,
जेव्ह्ना डुबून गेलेलो,त्याच्या खोलीत,न वरती येण्या खात्री;
त्या नजरेत होती एक वाट,एक,आस,कधी एक उत्सुक चमक,
जी माझ्या सर्व शब्दांचे काव्य करायची,सहज रचवून यमक;
कधी काजळ रुपी ढग,झाकायचे ते प्रखरीत बिंब,
मला हरवून करायचे,त्या गळत्या अश्रुने ओले चिंब;
त्या पापण कडा ज्या स्वागतायच्या,जसे टांगले तोरण,
माझ्या ओठी टेकायच्या,विसरून सगळे धोरण;
कायम भासते स्वप्नं झाकीत,ते धुंद चढते भाव,
जे किती सहज न्यायचे दूर,वसवून एक गाव;
त्या पापणीत मीच वसावं,जी कायम असली माझी मजल,
ती नजरच एक मद्य होती,जी रचायची माझ्या ओठी गझल;
तीच नजर थोडी थकली वाटली,ज्यात होते अनुभवाचे भान,
जे कदाचित स्मरून वाचत होते,जुन्या स्मृतींचे, पुसट पान.
ज्यांनी ओलावली तुझी डोळ कडा,काब्जावून आपली जकड,
बंदावल्या पापणीत मी अझुनही स्थित आहे,एकदा तर त्या उघड...!
चारुदत्त अघोर.(१५/५/११)