Author Topic: "खरचं किती वेडा होतो मी"  (Read 2921 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
"खरचं किती वेडा होतो मी"
---------------- ----------------
किती वेडा होतो मी,
जो तुझ्यावर प्रेम केलो...
जाणत असताना सारं काही,
तुझ्या डोळ्यात मला पाहिलो....

तुझे डोळे होतेच तसे,
मनास माझ्या वेड लावणारे...
जणु फुलातूनी शोधत गंध,
धुदं फुलपाखरु उडत सुटणारे....

खरचं मला माहित नाही,
का इतकं प्रेम तुझ्यावर प्रेम झालं...
जेव्हा पासुन पाहलोय तुला,
आता माझं माझंपन नाही राहिलं...

अजुनही त्या परतीच्या वाटेवर,
तुझी वेडी आस लावून बसतो...
अन् त्या सागरी किनार् यावर,
एकटेपणात लाटाशी बोलत राहतो....

खरचं किती वेडा होतो मी....

---------------- ----------------
स्वयंलिखीत:-
 ©कवी स्वप्नील चटगे.
[दि.10-05-2014]
---------------- ----------------