Author Topic: "देवाण-घेवाण"  (Read 616 times)

Offline nitinkumar

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
  • Ek Premveda
"देवाण-घेवाण"
« on: February 20, 2015, 02:54:14 PM »
"देवाण-घेवाण"

तू 'हाक' दे, मी 'साथ' देईन
तू 'हसू' दे, मी 'पाहत' राहीन

तू 'फुल' दे, मी 'सुवास' घेईन
तू 'धीर' दे, मी 'गंभीर' होईन

तू 'वात' दे, मी 'ज्योत' होईन
तू 'प्रश्न' दे, मी 'उत्तर' देईन

तू 'शब्द' दे, मी 'लेखणी' घेईन
तू 'गीत' दे, मी 'गात' जाईन
तू 'सूर' दे, मी 'ताल' देईन

आणि तू 'प्रेम' दे, मी 'वाहत' जाईन
तू 'प्रेम' दे, मी 'वाहत' जाईन


- नितीनकुमार

Marathi Kavita : मराठी कविता