Author Topic: "नाही आवडत मला"  (Read 1189 times)

"नाही आवडत मला"
« on: May 14, 2015, 08:13:39 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

नाही आवडत मला तो
परक्या मुलींशी गोड गोड बोलतो...

माझे मन दुखावून
तो लटकेच माफी मागतो...

पुन्हा पुन्हा चुका करुन
तो त्याच मार्गावर मदमस्त असतो...

असह्य होते मला जेव्हा
तो शब्दजाळात अडकवतो...

संताप मला आल्यावर
तो खोटे खोटे रडतो...

प्रश्न दाटतात खूप मनात
तेव्हा तुझा गैरसमज आहे म्हणतो...

जगण्या_मरण्याची भाषा करून
तो एवढा का मनमुराद वागतो...?

                        (स्वलिखित)

    Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)

Marathi Kavita : मराठी कविता