Author Topic: "प्रेम म्हणजे...."  (Read 1394 times)

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 236
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
"प्रेम म्हणजे...."
« on: May 17, 2015, 06:10:36 PM »
प्रेम म्हणजे फक्त,
त्याचं नी तिचं नव्हे..
प्रेम म्हणजे हृदय जोडणारं,
एक नाजुक नातं असतं..!!

प्रेम म्हणजे एक घरपण,
प्रेम म्हणजे मायेचे दर्पण..
प्रेम म्हणजे आईची माया,
प्रेम म्हणजे बापाची छाया..!!

प्रेम म्हणजे दादाचं ओरडणं,
प्रेम म्हणजे ताईचं भांडणं..
प्रेम म्हणजे आजोबांच्या गोष्टी,
प्रेम म्हणजे आजीने काढलेली नजरदृष्टी..!!

खरं तर...
प्रेम म्हणजेच गवताचं,
एक नाजकु पातं असतं..
हृदयाशी हृदय जोडणारं,
एक पवित्र नातं असतं...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार

(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
मो. 9970679949
http://m.facebook.com/PremVeda143

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind. K

 • Guest
Re: "प्रेम म्हणजे...."
« Reply #1 on: May 17, 2015, 06:36:35 PM »
मित्रा तुलाच प्रेम कळलं....!!

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 236
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
Re: "प्रेम म्हणजे...."
« Reply #2 on: May 18, 2015, 08:08:59 PM »
धन्यवाद....  :)